साल्हेरचे युद्ध...



   सन १६७१ च्या पावसाळ्यानंतर सुरतेजवळ तळ ठोकून बसलेले दिलेरखान बहादुरखान बागलाणात गेले. त्यांनी साल्हेरच्या बलाढ्य किल्ल्याला वेढा घातला. मराठ्यांनी तो नुकताच घेतला होता. साठ हजारांच्या ह्या मुघल सैन्यात इखलासखान, राव अमरसिंह, मुहकमसिंह इतर बरेच नामांकित सरदार होते. हा वेढा बसवल्यानंतर दिलेरखान रावळ्या किल्ल्याकडे पुढे गेला. बहादुरखान खालच्या बाजूला सुपे चाकणकडे निघाला. शिवाजी महाराजांनी मोरोपंत पेशवा प्रतापराव गुजर ह्या दोघांना एकत्र होऊन साल्हेरच्या वेढ्यावर आक्रमण करायला सांगितले. मोरोपंत त्यावेळी कोकणात होते. त्यांनी घाट चढून प्रतापरावाबरोबर साल्हेरच्या दिशेने कूच केले. त्यांच्याबरोबरही आनंदराव मकाजी, व्यंकोजी दत्तो, रावजी भोसले, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप संताजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो रंगनाथ, मुकुंद बल्लाळ, सूर्यराव काकडे इत्यादी अनेक सरदार होते. हे सैन्य साधारण चाळीस हजाराचे होते. सन १६७२ मधे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते साल्हेरला पोहोचले. सैन्य दोन फळ्यांमधे विभागून त्यांनी मुघलांवर आक्रमण केले. मुघलांनीही तोडीचा प्रतिकार केला तुंबळ युद्ध जुंपले. बरेच सरदार ह्या युद्धात कामी आले. मराठ्यांकडून सूर्यराव काकडे मृत्यूमुखी पडले तर मुघलांकडे इखलासखान, राव अमरसिंह, मुहकमसिंह इतर तीस मृत्यूमुखी पडले. मुघलांना ह्या युद्धात अपार हानी सोसावी लागली. साठ हजार घोडे, दीडशे हत्ती, सहा हजार उंट, हिरेजवाहीर, कपडालत्ता इतर सामग्री मराठ्यांना मिळाली. मुघलांकडील वीस सरदारांना जीवंत पकडले गेले. दिंडोरीच्या युद्धापेक्षा मोठे मोकळ्या मैदानातील युद्ध असूनही मराठ्यांनी ह्यात मुघलांचा मानहानीकारक पराभव केला. सहा मैलाच्या परिसरात हे युद्ध पांगले होते ह्यावरुन त्याची व्याप्ती लक्षात येते. मुघलांकडे जीवित हानीही अमाप झाली. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सरदार सैनिकांना शाबासकी दिली मोठी बक्षिसेही जाहिर करून त्यांचा सन्मान केला.

दहशदवाद


मित्रांनो,आपल्यापुढे नेहमी हे चित्र उभा केलं जातं
.शिवाजी महाराज अफझलखानाचे पोट फाडतात आणि खाली एक वाक्य लिहिलेले असतं
"
दहशतवाद असाच संपवावा लागेल.."
मग मराठ्यांच्या डोक्यात फिट बसतं की मुसलमान मारल्याशिवाय दहशतवाद संपत
नाही..
मग सुरु होतात दंगली,जाळपोळ..
त्यातुन मुलांवर केसेस,जेल आणि बरेच काही..
त्यांचे पुढचे भवितव्य अंधकारमय दिसु लागते.त्याला दंगलीत चिथावणी देणारे मात्र परत आपला हेतु साध्य झाल्यावर त्यांना विचारत देखील नाही.
त्यासाठी आम्ही शिवरायांवर मनापासुन प्रेम करत असलेल्या आमच्या मराठा बंधुना समजावून
सांगतो कि शिवाजी महाराजांची लढाई जातीची किंवा धर्माची कधीच नव्हती.
महाराजांनी अफझल खानाचे पोट फाडले हे खरे आहे,पण त्याबरोबरच अफझल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी सुध्दा मारला हे तुम्हाला का कळत नाही ?
याच्यावर चर्चा का होत नाही ?
शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते असे चित्र का निर्माण केले जाते ?
का तर म्हणे चारी बाजूंनी मुसलमान
राजे विरोधक होते..
पण मुसलमान राजे होते म्हणून काय
शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होतात काय ?
औरंगजेब च्या सैन्यामध्ये हिंदू नव्हते काय ?
मिर्झा राजे काय मुसलमान होता काय ?
औरंगजेबाने आपले चार भाऊ मारून टाकले ते काय हिंदू होते काय ?
आपल्या बापाला अटक केली तो काय हिंदू होता काय ?
या सर्व सत्तेच्या लढाया असतात हे आम्ही रोज समजावून सांगतो..
शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक होते तर
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण
होता-इब्राहीम खान
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण
होता-दौलत खान
शिवाजी महाराजांच्या घोड-दलाचा प्रमुख कोण होता-सिद्दी हिलाल
शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता-नूर खान
शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला कोण होता-मदारी मेहतर
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील कोण होता-काझी हैदर
शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे,तो काढणारा कोण होता-मीर महंमद
आणि
शिवाजी महाराजांना अफझल खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा कोण होता-रुस्तुमे जमान
हे सर्व मुसलमान..
एवढे जर मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर
शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असू शकतात काय ?
शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते;
त्या पैकी 10 मुसलमान होते.
आणि बॉडीगार्ड काय करू
शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा.
700
पठाणांची फौज औरंगजेबाला सोडुन आली आणि शेवटपर्यंत शिवरायांसाठी लढली.
शिवाजी महाराजांनी एक ही मस्जिद पाडली नाही.
एकही कुराण जाळले नाही.
मग शिवाजी महाराजांचे नाव मुसलमानांवर हल्ले करताना का वापरले जाते ?
याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे.
रायगड किल्ला राजधानी बांधल्या नंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले.महाराजांनी मंत्र्याला विचारले जगदीश्वराचे मंदिर बांधले पण माझ्या मुसलमान सैनिकासाठी मस्जिद कुठे
आहे ?
मंत्र्याने विचारले महाराज जागा दाखवा.महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली.हा इतिहास
आपल्या देशात का सांगितला जात नाही ?
हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चित नाहीशी होईल.आज महाराष्ट्रात एक आंदोलन चालू आहे कुठले ?
बोला जय शिवाजी , अन पाडा कबर !
कोणती कबर ?
प्रतापगडावरील अफझल खानाची कबर.आम्ही पोरांना रोज सांगतो,कबर पाडा पण अगोदर माहिती तरी करा ती बांधली कोणी ?
अफझल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले.
जिजाऊंनी विचारले अफझल खानाचे काय झाले ?
महाराज उत्तरले मासाहेब अफझल खान मारला गेला.
त्याचं प्रेत कुठ आहे ?
प्रतापगडाच्या पायथ्याशी.
काय म्हणाल्या असतील जिजाऊ ?
"
शिवबा अफझल खान जिवंत असे पर्यंत त्याच्याशी वैर होते.अफझल खान संपला(मेला),आता वैर ही संपले.अन तुमच्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्हया कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही
त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन करा आणि तुमच्या विजयाचे प्रतिक म्हणून तेथे खानाची कबर बांधा."
शिवाजी महाराजांनी अफझल खानच्या प्रेताचे प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले तेथे त्याची कबर बांधली.शिवाजी महाराजांनी ती कबर
बांधली.
मग आपल्याला काही प्रश्न विचारतो..
) अफजलखानाची कबर शिवरायांच्या पराक्रमाची निशाणी आहे,तीला आपण पुसुन टाकणार आहोत का ?
) ती कबर तोडुन आपण शिवरायांना चुकीचे ठरवणार आहोत का ?
) मृत्युनंतर वैर संपते हा जिजाऊंचा विचार नष्ट करणार आहोत का ?
) शिवद्रोह्यांचे ऐकुन आपल्याच रक्तामांसाच्या बांधवांची घरे जाळणार आहोत का ?
) आपला आपल्या बांधवांचा आपण असाच गैरवापर होऊ देणार आहोत का ?
मित्रांनो ही प्रश्नांची यादी अशीच पुढे वाढवता येईल..
विचार करा.
||
जय शिवराय ||

(
प्रत्येकाचे डोळे ऊघडे पर्यंत पुढे पाठवत चला.) —