शिवरायांचे निष्ठावंत मुस्लीम सैनिक.



शिवरायांचे निष्ठावंत मुस्लीम सैनिक.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

II
भाग - 2 II
"
सिद्दी इब्राहीम"
__________________________________________

अंगरक्षकांनीच आपल्या धन्याचा घात केल्याच्या अनेक घटना इतिहासात असतानाही, छत्रपतींनी आपला अंगरक्षक म्हणून "सिद्दी इब्राहीम" या मुस्लिम सैनिकाची निवड केली. काय चमत्कारी घटना आहे पहा, ज्यांच्या विरुद्ध लढायचे ते मुसलमान! आणि तरीही महाराजांचे अंगरक्षक मुसलमान...STRANGE ना......पण FACT आहे ती...मला तर हि गोष्टच मोठी "विलक्षण" वाटते. पुन्हा एकदा हे सिद्ध होते कि, शिवरायांची लढाई हि, धर्मासाठी, जातीसाठी नव्हती, तर ती एक लोककल्याणकारी शाषण व्यवस्थेच्या स्थापनेसाठी होती. थोडक्यात असेही म्हणता येईल कि , आजकालच्या जातीयवाद्यांना, कट्टरवाद्यांना ज्या शब्दाचा तिटकारा,राग, मत्सर, आहे, अश्या "SECULAR" राज्याच्या निर्मितीसाठी होती.
आफजलखानचा वध आणि फोंडा किल्ल्याची लढाई या दोन घटना " सिद्दी इब्राहीमांच्या" जीवनातील दोन महत्वाच्या घटना आहेत.
अफजलखानाला भेटायला जात असताना महाराजांनी ज्या १० "शिवराजरक्षकांची" निवड केली त्या मध्ये "सिद्दी इब्राहीम" यांचे नाव होते. येवून महाराजांची "सिद्दी " यांच्या वरील विश्वास व्यक्त होतो. खानाला मारल्यानंतर "सय्यद बंडा" ला "जिवाजी महाल्लांनी" तर रहिमतखान
पिलाजी मोहिते, शंकर मोहिते यांना "इब्राहीम सिद्दी" आणि "येसाजी" यांनी ठार केले. दरम्यानच्या वेळेत "भास्कर कुलकर्णीच्या" वारामुळे महाराज जखमी होतात.परंतु "सिद्दी इब्राहीम" सारखे मुसलमान छातीची ढाल करून महाराजांसाठी लढतात.
फोंडा किल्ल्यावर मराठ्यांचे निशाण फडकाव्न्यातही "सिद्दी इब्राहीम" यांचा सिहाचा वाटा आहे. "सभासदांच्या" बखरी प्रमाणे "सिद्दींनी" या लढाईत पराक्रमाचा कळस केला. ज्यामुळे महाराजांनी खूष होऊन फोंड्याची किल्लेदारी "सिद्दींना" बहाल केली. "सिद्दी इब्राहीम" यांच्या बाबतीत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते "स्वराज्याच्या" लष्करात "हजारी" या महत्वाच्या पदावर हि होते. एका "हजारी" च्या हाताखाली १२५० सैनिक असत.
छत्रपति शिवाजी महाराजांचे अंगरक्षक,लष्कराचे "हजारी,फोंड्याचे किल्लेदार, अश्या अनेक रोमहर्षक घटनांनी "सिद्दी इब्राहीम" यांचा इतिहास भरला आहे...
मग मित्रांनो मला सांगा..."त्यांची "स्वराज्यनिष्ठा" आपणास विसरता येईल का?"

"
जय जिजाऊ "
"
जय शिवराय
--------------------------------------------------------------------------------------
शिवराज्य सेनेचा हा सामाजिक सौहार्द वाढविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.. आशा आहे तुम्हाला आवडेल तो ...!!!!!
महाराजांचा लढा हा राजकीय होता..ते कधीच मुस्लिम विरोधी नव्हते ..पण तसा रंग त्यांच्या इतिहासाला, कर्तुत्वाला द्यायचा प्रयत्न काही लोग करतात..महाराज हे धर्माभिमानी तर होतेच...पण त्यांनी मुस्लीम आणि इतर धर्माचा पण कधीच द्वेष केला नाही एवढाच सांगायचा हा छोटासा प्रयत्न...
------------------------------------------------------------------------------------
मोहसीन शेख (शिवराज्य सेना ) —