इतिहासाच्या पानात हरवलेले अनामिक मराठा वीर - भाग १४



इतिहासाच्या पानात हरवलेले अनामिक मराठा वीर - भाग १४

संताजी पुत्र राणोजी घोरपडे.

मुघल पन्हाळ्याला थोडीथोडकी नव्हे तब्बल वर्षे वेढा घालून बसले होते पण किल्ला आणि किल्लेदार त्यांना काही दाद देत नव्हते. औरंगजेबाने आपले एका हून एक सरस उमराव पन्हाळ्यावर रवाना केले होते पण या पैकी कुणीच पन्हाळा काबीज करू शकले नाहीत.

किल्ल्यातून मराठे अनेक वेळेला मुघली छावणीवर रात्री-अपरात्री गनिमी हल्ला करीत आणि जमेल तेवढे शत्रूचे नुकसान करून पुन्हा गडावर पसार होत असत. गडावरच्या मराठयांना बाहेरून सुद्धा मदत मिळत असे. धनाजी जाधवांच्या आणि हिंदुराव घोरपडेंच्या सैन्याने सुद्धा पन्हाळ्याच्या आसमंतातील मुघली फौजेला हैराण करून सोडले होते.

पन्हाळ्याच्या आसमंतात अतुलनीय पराक्रम करणारा अजून एक वीर म्हणजे संताजी पुत्र राणोजी घोरपडे. या युद्धात राणोजी घोरपडेनवर जबाबदारी होती ती मुघली रसद मारण्याची आणि त्यांनी ती चोख बजावली. राणोजी घोरपडे शिपाईगिरित आपल्या वडलांच्या पुढेच होते असे काही इतिहासकार लिहितात. १७०२ च्या सुमारास मुघली फौजेशी सामना करताना राणोजी घोरपडे धारातीर्थी पडले.

महाराणी ताराराणीसाहेबांनी राणोजी घोरपडेंच्या विधवा पत्नीला नंतर राणोजीच्या पराक्रमाची याद ठेवून कापशी सुभा इनाम म्हणून दिला.

वेडात मराठे वीर दौडले सात.....
त्या सात योद्धांची नावे.
) विसाजी बल्लाळ.
) दीपोजी राउतराव.
) विट्ठल पिलाजी अत्रे.
) कृष्णाजी भास्कर.
) सिद्धि हिलाल.
) विठोजी शिंदे
) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर
बहलोलखान नावाचा आदिलशाही सरदार स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने रयतेवर अन्याय करणे चालू केले. महाराजांनी त्यास धुळीस मिळवण्याचा आदेश प्रतापरावांना दिला.
मराठ्यांच्या गनिमी काव्याने बहलोलखान जेरीस आला. वेळ प्रसंग पाहुन तो मरठयांना शरण आला आला. आता शरण आलेल्याला मारु नये असा हिंदु धर्म सांगतो; त्यामुळे त्या तत्वनीष्ठ मराठ्याने त्याला धर्मवाट दिली, तो गनीम जिव वाचवून गेला.
पण नंतर दगाबाज बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला. आणि शिवरायांनी रयतेला त्रास देणारा बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांचि पत्र पाठऊन कानऊघडणी केली. त्या पत्रात एक वाक्य होत जे प्रतापरावांच्याजिवास लागल. शिवरायांनी म्हटल होत की "बहलोलखानास पकडल्या शिवाय मला तोंड दाखवु नये".
हे वाक्य वाचुनत्यांनी आपल्या सहा सहकरयांकडे नजर टाकली आणी त्यांनी आपापले भाले सरसावले.त्या सात जणांनी मरणाला समोरा समोर ट्क्कर दीली.