औरंगाबाद चे संभाजीनगर करायचे असेल तर स्वत:पासुन सुरवात करा - If you want to Aurangabad 's Sambhajinagar yourself start to ...

माझा स्वतः चा अनुभव सांगु इच्छितो..
मी (श्री. जोतीबा जाधव ) ,
बाहेर गावाहुन खुप वेळा संभाजीनगरला येताना ही गोष्ट अनुभवली आहे...
की जेव्हा मी संभाजीनगर ला एस.टी. ने गेलोय तितक्या वेळेस फक्त एकचं विचार डोक्यात चालायचा की, टीकीट घेत्यावेळेस कंडक्टर ला औरंगाबाद म्हणुन मागू की संभाजीनगर म्हणून मागू...
मनात खुप विचार चालायचे की मी त्यांना 'संभाजीनगर' म्हणुन टिकीटे मागीतल्यावर ते काय म्हणतील, लोक, शेजारी बसलेले काय म्हणतील ???
असं खुप दिवस झालं पण एकदा पैठणहुन संभाजीनगरला जाताना मनात निश्चय केला.
की नाही आता खुप झालं औरंगाबाद - औरंगाबाद आता म्हणायचे तर फक्त 'संभाजीनगर' च ...
आणि त्या दिवशी मी त्या बस मधील कंडक्टर ला 'संभाजीनगर ' एक टीकीट द्यायला सांगितले...
आणि मग काय???...
पाहीलं पण आणि चांगला अनुभव पण आला, की सर्वात पहिले तर त्या कंडक्टर साहेबांनी मला "जय महाराष्ट्र " केला मग काय?
माझही रक्त मराठीचं. मग माझाही छाती फुगली आणि कधी तोंडातुन "जय महाराष्ट्र " बाहेर पडलं कळालंच नाही.....
आणि त्या पेक्षाही जास्त आनंद आणि गर्व ह्या गोष्टीचा झाला की माझ्यामुळं शेजारील दोनही वयस्कर काका-काकु नी सुद्धा 'संभाजीनगर' म्हणुनचं टिकीट काढलं... ते बघून बस मधील अजुन ३ जणांनी सुद्धा 'संभाजीनगर ' म्हणुनचं टिकीटं मागितली...
च्यायला फक्त मी एकट्याने संभाजीनगर म्हणाले तर अजुन ४-५ जण पण म्हणाले ..
मग विचार करा तुम्ही सर्व जर एकत्र मिळुन हे प्रयत्न कराल किंवा काहीजण जे आधीपासुनच हे महत्त्वाचे काम करत आहेत त्यांनीही हे जरूरीचे प्रयत्न चालू ठेवले तर तर संपुर्ण राज्यात संभाजीनगर चे नाव रूढं व्हायला वेळ नाही लागणार भावांनो...
तुम्हा सर्वांना माझी एकचं कळकळीची विनंती... फक्त बस च नाही तर जिथं जिथं संधी मिळेल तिथं प्रत्येक मराठी बंधुभगीणींनीं संभाजीनगरचं म्हणुन बोलावं. औरंगाबाद म्हणायची सवय मोडावी म्हणुन सर्वांनी जरूर प्रयत्नशील व्हावं
ते म्हणातात ना वाईट सवयी सोडताना त्रास होतोच..
"होईल त्रास पण गुण हमखास "
म्हणुन सांगतो सर्वांनी प्रयत्न करून मदत कराचं...