छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स.१४ मे,१६५७
रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या
'मातोश्री सईबाईंचे'निधन,संभाजीराजांच्या लहान वयात झाले. त्यामुळे
पुरंदर किल्ल्याच्या जवळ
असलेल्या कापूरहोळ गावातील 'धाराऊ'राजेंच्य
दुधाई बनल्या.लहानपणापासूनच बुध्दिमान
असलेल्या संभाजीराजेंनी युध्दाचे
डावपेच,राजकारण लवकर आत्मसात केले.
छत्रपती संभाजीराजे,ज्यांचे वर्णन
सिंहाचा छावा म्हणून शोभते.आठ
भाषांचा जाणकार असणारा हा महाराजा,
ज्यांनी 'बुधभूषणम्' हा संस्कृत तर
'नायिकाभेद', 'नखशिख', 'सातसतक' हे
ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिले.हा थोर
राजा जसा लेखणीतही श्रेष्ठ
होता तसा तो रणांगणात श्रेष्ठ होता.बुध्दिमत्त
आणि शौर्य श्रीशंभूराजामध्ये भरले
होते.आपल्या नऊ वर्षाच्या कारकीर्दीत
त्यांनी स्वराज्याचा विस्तार दुप्पट
केला,स्वराज्यातील
एकही किल्ला गमावला नाही.मराठ्यांचे आरमार
शक्तीशाली केले.कर्नाटकातील मराठी राज्य
वाढविले,पोर्तुगीजांचे तीन चतुर्थांश राज्य
जिंकले,औरंगजेबच्या सैन्याची दाणादाण
उडविली,असा हा छावा. छत्रपती संभाजीराजे
एकाच वेळी मोघल, इंग्रज, पोर्तुगीज,
सिद्दीशी लढत होते.