सिवा किसा सुनि कैकही, तुमी छत्री सिरताज |
जीत अपनी भूम कौ, करौ देशकौ राज ||
करौ देशको राज छतोरे, हम तुमतैं कबहूँ नहिं न्यारे ||
दैरि देस मुगलनके मारौ | दबटि दिली के दल संहारौ ||
तुरकन की परतीत न मानौ | तुम केहार तुरकन गज जानौ ||
तुरकन मे न विवेक विलोक्यौ | मिलन गये उनकौ तुम रोक्यौ ||
हमको भई सहाइ भवानी | भय नहि मुगलन की मन मानी ||
छलबल निकसि देंशमें आये | अब हम पै उमराइ पठाये ||
हम तुरकन पर कसी कृपानी | मारि करेंगे कीचक धानी ||
तुम हूँ जाइं देस दल जोरौ | तुरक मारी तरवारनि तौरौ |
राखि हियै व्रजनाथ कौ, हाथ लेड करवार |
ये रक्षा करि है सदा, यह जानो निरधार ||७||
:- लाल कवि
अर्थ :- हकिकत ऐकून शिवाजीराजे म्हणाले, "छत्रसालजी, तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी. तुम्ही जाऊन आपली मायभूमी जिंका, आणि स्वदेशावर राज्य करा. तुमच्यापासून आम्ही बिलकूल निराळे नाही. मोगलांचे प्रदेश मारून जींका. त्यांच्या दलसंहारांना देशोधडीस लावा. तुर्कांचा विश्वास बिलकूल धरू नका. तुम्ही सिंह व तुर्क गज असे माना. तुर्कांच्या ठिकाणी विवेक कसा तो कोणी पाहीलाच नाही. तुम्ही भेटीस गेला, तर ते तुम्हास अडवितात, मला देवी भवानी सहाय आहे, म्हणून मोगलांचे भय मला बिलकूल वाटत नाही. ते कपट बलाने या देशात आले, त्यास काढून द्या. आमच्यावर त्यांनी उमराव पाठविले आहेत. तुर्कांच्या वर माझी तरवार उघडलेली आहे. कीचका प्रमाणे आपण त्यांचा संहार करावा. तुम्ही स्वदेशी जाऊन आपल्या फौजा जमवा. तुर्कांना मारण्यात तरवारी तोडून घ्या. अंतःकरणात व्रजनाथ श्रीकृष्ण साठवून ठेवा, आणि हातात घ्या तरवार! तोच सर्वांचे संरक्षण करणारा आहे, हा निर्धार असू द्या!
संदर्भ :- लाल कवि कृत छत्रसाल ग्रंथ.