श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा - Shri Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Greetings......



शालिवाहन शके १५५१ फाल्गुन वद्य तृतीय शुक्लनाम संवत्सर शिशिर रुतुत सुर्याचा तेजालाही फीके पाडणार्या पराक्रमी सुर्याचा जन्म जुन्नर मावळात शिवनेरीवर झाला.
ह्या प्रसंगाचे वर्णन शब्दात व्यक्त करणं केवळ अशक्यच ते वर्णन करावे फक्त शिवनेरीचा तटाबुरुजांनी आणि शिवाई देवीनेच .
युगा युगांनी असे क्षण येतात .
त्या दिवशी शिवाने सूर्य दर्शन घेतले आणि सूर्याने शिव दर्शन घेतले !
३०० वर्ष महाराष्ट्रिय लोक जगदम्बेच दार ठोटावित होते . विनवणी करत होते "दार उघड बये ,दार उघड , तुळजा भवानी आई ार उघड !!
आज आई भवानीने साकडं ऐकल .
तिने तिचे दार सताड उघडले आणि सह्याद्रिचा कुशीत महाराष्ट्राचं सौभाग्य जन्माला आलं.
शिवनेरीचा नगारखाण्यात नगारे वाजू लागले .तोफा कडाडल्या आणि त्याचा आवाज दिल्हिचा तख्तापर्यन्त धड़क्ला आणि बादशहाचा कानठळ्या बसल्या .
गडावर भगवा ध्वज फडकू लागला आणि त्याची धास्ती आदिलशाह ला बसली .
सर्व अमंगल नरपशुन्साठी तो क्षण चेताव्निचा होता आणि सुजनान्सठी आनंदोत्सव होता.
महाराज
राजाश्रीयाविराजित
सकळगुणमंडळीत
राजनितीधुरंधर
प्रौढप्रतापपुरंधर
क्षत्रियकुलावतंस
महाराजाधिराज
हिंदवी स्वराज्यसंस्थापक
मुघलदलसंहारक
अखंडीत लक्ष्मैअलंकृत
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
अष्टावधानजागृत
अष्टाप्रधानवेष्टीत
हिंदुप्रतिपातशहा
गडपति
भूपति
हयपति
जळपति
सर्वांधिपती
यशवंत
पुण्यवंत
किर्तीवंत
नितीवंत
वरदवंत
जाणता राजा
श्री सुवर्णसिंहासनाधिश्वर
पुण्यश्लोक
श्रीमंत
छत्रपती
श्री शिवाजी महाराजांचा जन्म झाला
पुत्र जिजाऊंना झाला
पुत्र शहाजीराजांना झाला
पुत्र सह्याद्रिला झाला
पुत्र महाराष्ट्राला झाला
पुत्र भारतवर्षाला झाला !!!
आनंदी आनंद वनभुवनी

विश्वातील सर्व शिवभक्तांना श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा... ...