शंभू चरित्र भाग:- 02 (वाचा आणि शेअर करा आपल्या राजाचा इतिहास) - Shambhu history of : - 02



शंभू चरित्र भाग:- 02
वाचा आणि शेअर करा आपल्या राजाचा इतिहास)
ज्यावेळी कोणा एखाद्या गावरान माणसाला प्रश्नं
विचारला जातो..."संभाजी राजे कसे होते तुम्हाला माहितीये का?" तो दोन
शब्दांत उत्तरं देतो. "संभाजी महाराज रगेल होते" आणि "संभाजी महाराज
रंगेल होते". दोन शब्दांत "संभाजी राजांचा" इतिहास बदलून
जातो. इतिहासानं ना- ना आरोपांच्या फायरी झाडल्या त्यां
"संभाजी स्वर्याचारी, संभाजी रगेल, संभाजी रंगेल, संभाजी राजाने
मराठेशाही बुडवली, संभाजी राजे म्हणजे शिवछत्रपतींच्या
पोटाला आलेला नादान तख्तनंशील वारीस, संभाजी राजे म्हणजे
स्वराज्यद्रोही, संभाजी राजे म्हणजे मुघलांच्या गोठात जाऊन मिळालेले,
संभाजी राजे म्हणजे छत्रपतींचे पुत्रं असूनं युवराज असूनं
मोघलांना सामील झालेले". ना-ना, ना-ना, ना-
ना आरोपांच्या फायरी झाडल्या. बदनाम होत राहिला "संभाजी"
गेली ३५० वर्ष. काय वस्तूस्थिती? काय खरा इतिहास?
इतिहासाची पानं ज्यावेळी चाळतो पुरावे पाहतो, त्यावेळी लक्षात येतं
१४ मे १६५७ पुरंदरवरं एका "शिवरत्नाचा" जन्मं
झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून "माँसाहेब"
जिजाऊनी त्यांचं नामकरणं केलं बघता बघता संभाजींच्या बाललीलांनी
हरपू लागली. वय झाल सव्वा दोन वर्ष आणि त्याच वेळी नियतीनं
गलती केली. संभाजी राजांच्या "मातोश्री सईबाई
महाराणी साहेब" यांचं निधनं झालं. दहिवरचं मातृत्वाचं छत्रं हरपलं.
पिता "शिवाजी राजे" तर सतत पाठीला मरण बांधून मुलुखभर दौड
घेणारे,पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी?
पण! याचवेळी सामन्याला "माँसाहेब" जिजाऊ. अजून दुसरा "शिवाजी"
घडवायचं सामर्थ्य जिजाऊत नक्कीच आहे. आणि जिजाऊ
नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापि "संभाजी" राजांचं शिक्षण चालू झालं.
संभाजी राजे "लिहिणं-वाचणं शिकले", "चालणं-बोलणं शिकले",
"पळणं-खेळणं शिकले". बघता बघता ना-ना कला, ना-
ना विद्या, ना-ना गुण त्यांना आत्मसाद झाले. एक नाही,
दोन नाही, तीन नाही, चार नाही तब्बल सोळा-सोळा भाषा संभाजी राजांना यायला
मराठी येते, उर्दू येते, फारसी येते, कानडी येते, तामिळ येते, मल्ल्याळ
येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत सुद्धा संभाजी राजांना येतेय.
राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र,
प्रभागशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये
संभाजीराजे तेज तरबेज झाले. काव्यगुण सुद्धा त्यांनी जोपासला.
संभाजी राजांनी वयाच्या चौदाव्या वर् नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला.
या "बुधभूषणम्" नावाच्या ग्रंथामध्ये संभाजीराजे
"श्री गणेशाचं" वर्णन करताना लिहितात,
"पदपदम् पत्रं समचरणंजंग जिमीकलक् कलवकर् ....!!!
नाभीलालित् कबीरउदरलंबित विशालंवर् ....!!!
वरंदिर्घतिमुण्डी करंदेत् चारीफ़ल्....!!!
एकदन्तरुसुण्ड् लवतरिजत्
सकलंमल्....!!!"
हे संभाजी राजांनी संस्कृत मधून "श्री गणेशाचं" केलेलं वर्णन आहे.
'नकशिका', 'नायिकाभेद', 'सातसतर्क' यांसारखे कैक ग्रंथ
त्यांनी प्रसिद्ध केले. आणि बघता बघता उत्तमं
कवी म्हणून "संभाजी राजांचा" नावलौकिक झाला. बुद्धीचं
कार्यक्षेत्र तर काबीज केलंच पण त्याचवेळी शरीराचं, शरीरंसंपदेचं,
हा संभाजी ना-ना विद्यामध्ये,व्यायामामध्ये तेज तरबेज झाला.
"मल्लविद्या", "भालाफेक","तलवारबाजी", "घोडेस्वारी"
याच्यामध्ये संभाजी राजांनी मोठी हुकुमत
पैदा केली. अरे! घोडेस्वारीमध्ये संभाजी राजांचा हात कोणी धरतं
न्हवतं. तत्कालीन काळामध्ये पळत्या घोड्याला एका पायावर
उभा करणारा आणि गर्रदिशी डोळ्या तोवर फिरवणारा या जगाच्या पाठीवर
एकचं योध्दा झाला. त्या योद्ध्याचं नाव होतं....""संभाजी"
(