व्हियेतनाम या लहानग्या देशानं अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला नमवलं होतं - The small country of Vietnam was humble to a strong country like the United States.


व्हियेतनाम या लहानग्या देशानं अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला नमवलं होतं .
जवळपास वीस वर्ष चाललेल्या या युद्धात अमेरिका पराजित झाली होती.

विजया नंतर व्हियेतनामच्या राष्ट्रध्यक्षाला एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला साहजिकचं तो युध्द कसे जिंकला हाच असणार अमेरिकेला कसं नमवंल हाच असणार त्यावर दिलेलं हे उत्तर वाचा.....

"मुळात अमेरिका बलाढ्य देश मात्र त्याच बलाढ्य देशाला नमवण्यासाठी मी एका महान राजाचं चरित्र वाचलं होतं आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी युद्धनितीचा वापर केला आणि सहज विजय संपादन केला...

पुढे पत्रकारानं विचारलं की कोण होता तो महान राजा?
मित्रानों जेव्हा मी वाचलं तेव्हा माझी ही छाती चांगलीच फुगली जशी आता तुमची फुगेल..
तर या प्रश्नावर व्हियेतनामचे राष्ट्राध्यक्ष जागेवर उभा राहिले आणि
"छत्रपती शिवाजी महाराज" असं नावं घेतंल.

नाव घेत असताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळेच तेज दिसत होत !!

पुढे ते म्हणाले की असा राजा जर आमच्या देशात जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केलं असतं.
काही वर्षांनंतर राष्ट्रध्यक्षांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आपल्या समाधीवर "शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्त झाला" असं लिहून ठेवलंय....

कालांतराने व्हियेतनामच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतचा दौरा केला ठरलेल्या राजकीय कार्यक्रमानुसार त्यांना लाल किल्ला आणि गांधीजींची समाधी दाखवण्यात आली .

मात्र हे दाखवतं असताना त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे हे विचारलं .
तेव्हा तेव्हा भारतीय सरकार थबकलं आणि रायगड असा उल्लेख केला .... परराष्ट्र मंत्री रायगडावर आल्या आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं .

समाधीचं दर्शन घेतल्या नंतर रायगडावरची माती उचलली आणि आपल्या बॅगमध्ये भरली यावर पत्रकारांनी या माती मागचं कारण विचारलं त्यावर मंत्री महोदय म्हणाले की , ही माती शुरांची आहे " या मातीत महान राजा जन्माला आला हिचं माती मी माझ्या देशाच्या मातीत मिसळणार आहे .

जेणे करुन आमच्या देशातही असे शुर पुरुष जन्माला येवोत...

माझा राजा हा फक्त महाराष्ट्राला हेवा वाटावा नसून संपूर्ण जगाला हेवा वाटावा असाच आहे !!!
!! छत्रपती शिवाजी महाराज की जय !!
!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे !!