सिंधू संस्कृतीत गणमातांचा उल्लेख त्याकाळी "शिरीमाता" असा करीत नंतर फक्त "शिरी" असाच होऊ लागला. "शिरी" म्हणजे "गणमाता" शिवरायांचा सर्व पत्र व्यवहार व दैनंदिन जीवन याच "शिरी" ने सुरु होत असे. प्रत्येक पत्राच्या वरच्या बाजूस "शिरी" लिहिण्याची सांस्कृतिक परंपरा होती. ह्याच शिरीचा अपभ्रंश "श्री" असा झाला आहे. "श्री" ही उपाधी मुळातच "स्त्रीलिंगी" आहे. अथवा "सर्वलिंगी" आहे. आपण आता "श्री" म्हणजे पुल्लिंगी समजतो. अशी सांस्कृतिक वाटचाल होत असते. मुळातच "शिरी" म्हणजे गणमातांचे प्रातिनिधिक स्वरूप हे आपण ध्यानात ठेवावे. म्हणूनच हे राज्य व्हावे ही "शिरींची" इच्छा आहे असे महाराज म्हणत असत. महाराजांच्या स्वराज्याच्या शिरीमाता म्हणजे श्री माता या राजमाता जिजामाता होत्या.
या वाक्यातील "हिंदवी" हा शब्द "राष्ट्रवाचक" आहे. भारत देशासाठी हा शब्द वापरला जातो. शिवाजी महाराजांनी "हे हिंदु राष्ट्र व्हावे ही श्रीं ची इच्छा" असे म्हटलेले नसून त्यांनी "हिंदवी" हा "देशवाचक" शब्द वापरला आहे. राष्ट्रगीतात सुद्धा "हिंद" हा शब्द भारतासाठीच वापरला आहे. आता देशभरात "जय हिंद" म्हटले जाते. यातून भारता देशाप्रती आदर प्रकट होतो. "जय हिंदू" असे कुठेही म्हटले जात नाही. कारण की आज "हिंदू" हा शब्द "धर्मवाचक" झालेला आहे.
श्रीं ची इच्छा म्हणजे, हे "श्री" म्हणजे कुठलेही काल्पनिक देवी-दैवत व धर्ममार्तंड नसून शिव-सिंधू संस्कृतीतील "शिरीमाता" म्हणजेच शिवकाळातील जिजामाता यांचे राज्य आहे. हा याचा अर्थ आहे. हा जसा भारतीय सिंधू परंपरेचा अभिमान होता, तसाच मातृसत्ताक शासनपद्धतीचा जिजामातेचा मातृसन्मान होता. याच भावनेतून शिवरायांनी राज्यकारभार चालविला. रयतेला पोटच्या लेकरासारख संभाळल. या मागे जिजामाता या गणमातेची शक्ती उभी होती. म्हणून जिकडे तिकडे नारे गुंजत असत, "जय जिजाऊ - जय शिवराय !" एवढी रयत जनता शिवमय झाली होती. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा ! असे महाराज म्हणत यामागचा उद्देश अशा प्रकारे शिवधर्मीय मातृप्रधान समतावादी व न्यायवादी समाजनिर्मिती. सामाजिक, आर्थिक, व राजकीय समता व समानता स्त्री-पुरुष भेद नाही. महाराजांनी स्त्रियांचा समाज निर्मितीत संपूर्ण सहभाग घेतलेला होता. त्यांना घरच्या घरी युद्धसामुग्री तयार करणे राज्यासाठी उपयुक्त साहित्य तयार करणे. असे काम दिल्या जाई.