मध्य प्रदेश मधील बुऱ्हाणपूर वरील छापा - Attack on burhanapura in Madhya Pradesh



मध्य प्रदेश मधील बुऱ्हाणपूर वरील छापा

२८ जानेवारी १६८१
शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला हे आपल्याला माहित आहे , दोनदा टाकला हेही आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला .
उत्तरेकडील आग्रा आणि दिल्ली हि शहरे म्हणजे मोगलांची सर्वात मोठी वैभवनगरे. पण यानंतर बुऱ्हानपूर हि मोगलांची एक मोठी वैभवनगरी होती. तिची दुसरी ओळख म्हणजे “दक्षिणेचे प्रवेशद्वार”. भारतातली एक मोठी बाजारपेठ होती.
राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ ला झाला आणि लगेच १४ व्या दिवशी छापा टाकला.
रायगड ते बुऱ्हाणपूर हे १०००किमी पेक्षा जास्त अंतर आहे . परंतु फक्त ४ ते ५ दिवसा मध्ये संभाजी महाराज बुऱ्हाणपूर ला पोहोचले .
आणि १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली .