शिवाजी महाराजांच्या निधना नंतर मुगल बादशाह औरंगजेब स्वतःच स्वराज्यावर चालून आला होता.
१६८० मध्ये दिल्लीचा पातशहा, औरंगजेब महाराष्ट्रावर ५ लाखाची सेना घेवून चालून आला.
त्यावेळी संभाजी महाराजांचे वय फक्त २३ वर्ष होते
औरंजेबाची हा सेनासागर मराठ्यांच्या सैन्य संखेच्या दहा पट होता.
५ लाखांचे सैन्य, १४ कोटी खजिना, ४० हजार हत्ती, ७० हजार घोडे, ३५ हजार उंट.
इतका अफाट सैन्यासागर होता कि औरंगजेबाची छावणी ३ मैलांपर्यंत पसरायची.
काही दिवसातच महाराष्ट्र आणि दख्खन जिंकून घेणार अशी अशा बाळगून आलेल्या या दिल्लीकराला संभाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी ७ वर्ष जुंझत ठेवला.
जोपर्यंत संभाजी महाराजांना कैद करणार नाही तोपर्यंत डोक्यावर मुकुट (शाही पगडी) घालणार नाही असा प्रणच त्याने केला होता.
नाशिक जवळचा रामशेज हा किल्ला तर फक्त ६०० मावळ्यांनी जवळपास ६ वर्ष अजिंक्य ठेवला होता.